आजार बरे होतात म्हणून घालीन लोटांगण…

November 18, 2014 10:33 PM0 commentsViews:

mravati18 नोव्हेंबर : आजही राज्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार सर्रास सुरू आहेत. अमरावतीमध्ये शीरखेड गावात नानागुरू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त लोटांगणं घालण्याचा प्रकार चालतो. भाविक 500 ते 1000 मीटरचा रस्ता लोटांगण घालून पार करतात. यामध्ये लहान मुलांचाही समावेश असतो.

अमरावती जिल्ह्यातल शीरखेड नावाच्या गावात नानागुरू महाराजांची पुण्यतिथीनिमित्त लोटांगण घालण्याचा प्रकार घडतोय. यामध्ये लहान मुलांसाह हजारो भाविक 500 ते 1000 मिटर पर्यत लोटांगण घालत असतात. जवळपास 350 वर्ष जुनी परंपरेच्या नावाखाली हा प्रकार इथं सर्रास पाहायला मिळतो. नानागुरू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त या गावामध्ये जत्रेच स्वरुप असते. या गावातील नागरिक देशाच्या कुठल्याही कोणाकोपर्‍यात असेल तरी या पुण्यतिथीसोहळ्यामध्ये आवर्जून उपस्थित राहतात. एवढेच नव्हे तर महीला दिवाळी एवजी पुण्यतिथीलाच गावात येतात. मंदिरासमोरच पाण्याने भरलेल्या हौदामधील पानी तोंडावर शिपल्या जाते आणि इथूनच लोटांगणाला सुरूवात होते. हे पाणी शिंपडल्याने व लोटांगण घातल्याने असाध्य आजार बरे होतं असल्याची या लोकांची भावना आहे. लोटांगणं घालताना इजा होण्याची शक्यता असते. पण असाध्य आजार दूर होतो या आशेमुळे गेली साडे तीनशे वर्षं हा प्रकार सर्रास सुरू आहे. हे लोटांगण घालणारे भाविक खाली साचलेल्या पाण्यातून जातात यामुळे साथीचे आजार फैलावतील याचाही विचार केला जात नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close