आयबीएन-लोकमत इम्पॅक्ट : गुरुनानक इंग्लीश हायस्कूल सुरू करण्याचा निर्णय

June 23, 2009 11:21 AM0 commentsViews: 1

23 जून मुंबईच्या कुलाबा-नेवीनगर मधील गुरुनानक इंग्लीश हायस्कूल सुरू करण्याचा निर्णय ट्रस्टी आणि लष्करी अधिकार्‍यांनी घेतला आहे. सुरक्षेच्या कारणावरून नेव्हीने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण आयबीएन-लोकमतने त्या शाळेतले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या समस्या लावून धरल्यानंतर शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आता शाळेला दहा वर्षांची मुदत देण्यात आली आहे. मात्र दरवर्षी एकएक इयत्ता कमी करत टप्प्याटप्य्याने शाळा बंद करण्यात येणार आहे.दरम्यान, गुरुनानक इंग्लीश हायस्कूलचे ट्रस्टी आणि लष्करी अधिकार्‍यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर शाळा सुरू करण्यात आली आहे. पण दरवर्षी एक इयत्ता बंद करण्याचा करारही या बैठकीत झाला आहे. नव्याने ऍडमिशन घेणार्‍या मुलांसाठी आयबीएन लोकमतने केलेल्या पाठपुराव्यामुळे इतर शाळेतल्या जागा वाढवण्याचं आश्‍वासन दक्षिण मुंबई शिक्षण विभागाच्या सेक्रेटरीसुमन शिंदे यांनी दिलं आहे.

close