भाजपला पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात चिंता

November 19, 2014 12:59 PM1 commentViews:

NCP
19 नोव्हेंबर :  आवाजी मतदानाच्या जोरावर बहुमत सिद्ध करणार्‍या भाजप सरकारला पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चिंतेचं काहूर माजलं आहे. त्याचे तीव्र पडसाद कालच्या (मंगळवारी) अलिबागच्या चिंतन शिबिरात उमटले. ‘भाजप सरकारला पाठिंबा देवून आपण चूक करत असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केलं आहे.

अलिबागमध्ये सुरू असणार्‍या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात काल (मंगळवारी) शरद पवारांनी मोठा गुगली टाकला आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली. भाजप सरकार चालवायचा राष्ट्रवादीने मक्ता घेतलेला नाही असं म्हणत त्यांनी भाजपवरचं दबावतंत्र कायम ठेवलं आहे. एकीकडे शरद पवारांनी कधीही मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, त्यामुळे कामाला लागा, असा आदेश कार्यकर्त्यांना दिला होता. तर दुसरीकडे भाजपला पाठिंबा दिल्यामुळे सेक्युलर मतं कायमस्वरूपी दुरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे, आणि भविष्यात त्याची मोठी किंमत राष्ट्रवादीला मोजावी लागेल अशी चिंता ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पवारांसमोर बोलून दाखवली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही, स्वार्थासाठी आपण विचारधारेशी तडजोड करत असल्याचा संदेश लोकांपर्यंत जात असल्याची भूमिका मांडली आहे.

जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या या परखड भूमिकांमुळं राष्ट्रावादीत आता अस्वस्थता पसरली आहे. यापार्श्वभूमीवर आज चिंतन शिबिराचा समारोप करताना शरद पवार काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्षं लागलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • sudhir

    kahi kurbur vagare nahi phakt lokana dakhavayachi natake

close