भारतात इबोलाचा शिरकाव, दिल्लीत रूग्ण आढळला

November 19, 2014 9:36 AM0 commentsViews:

ebola_usa

19 नोव्हेंबर : दक्षिण आफ्रिकेत इबोलाने थैमान घातला आहे. आतापर्यंत 5,000 हजारहून अधिक लोकांना इबोलाची लागण होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात लायबेरियामध्ये इबोलासाठी उपचार घेऊन परतणारा एक भारतीय नागरिक दिल्ली विमानतळावर दाखल झाला. त्याला विमानतळावर तयार करण्यात आलेल्या एका विशेष कक्षामध्ये इतरांच्या संपर्कापासून दूर ठेवण्यात आलं आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 26 वर्षांचा हा तरुण 10 नोव्हेंबरला भारतात दाखल झाला. त्याच्यावर लायबेरियामध्ये इबोलासाठीचे उपचार करण्यात आले होते. पुन्हा चाचणी करण्यात आली असता त्याच्यात इबोलाची कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाहीत. पण लगेच इतरांशी संपर्कात आल्यास इबोलाचा संसर्ग होऊ शकतो म्हणून त्याला विशेष कक्षात ठेवण्यात आलं आहे.

काय आहे इबोला?

– जनावरांमार्फत माणसांना इबोलाचा संसर्ग होतो
– जनावरांचं रक्त, मांस, मलमूत्र इ.चा माणसाशी संपर्क आला तर इबोलाच्या संसर्गाची शक्यता वाढते
– तसंच ज्या व्यक्तीचा इबोलानं मृत्यू झालाय त्याच्या रक्ताशी संपर्क आल्यास इबोलाचा संसर्ग होतो

लक्षणं

– ताप, नाका-तोंडातून रक्त येणं
– लगेचच स्कीन इन्फेक्शन होणं
– अंगावर पुरळ येणं
– डोळे येणं, तोंड येणं

काय काळजी घ्यावी ?

– प्राथमिक स्वच्छता बाळगणं अत्यंत आवश्यक आहे
– विशेष करुन मांसाहारी लोकांनी स्वच्छता बाळगणं आवश्यक आहे
– स्वच्छ ठिकाणांहून मांस खरेदी करावं
– मांस नीट शिजवावं
– दुखापत झालेल्या प्राण्यांचं मांस खाऊ नये
– स्वच्छ पाणी प्यावं
– बाहेरील खाद्यपदार्थ टाळावे
– जेवणा आधी हात साबणाने स्वच्छ धुवावे
– केर-कचर्‌याची व्यवस्थित विल्हेवाट लावा.
– कुरतडणारे प्राणी हा विषाणु पसरवू शकतात

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close