स्पेशल कोर्टाने बजावलं 22 पाकिस्तानी अतिरेक्यांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

June 23, 2009 2:06 PM0 commentsViews: 3

23 जून, मुंबई 26/11 च्या मुंबई हल्ल्याप्रकरणी स्पेशल कोर्टाने 22 पाकिस्तानी अतिरेक्यांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलं आहे. या 22 जणांच्या यादीमध्ये लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफीज सईदचाही समावेश आहे. कसाबने मंगळवारी त्याच्या कबुलीजबाबात त्या 22 जणांची नाव सांगितली असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. झकिर उर रहेमान लकवी, अमीर सईद, आबू हामजा, आबू उर कामा, आबू कासा, मुबंबीर, जरार शहा, आबू फादूल्ला, आबू आनस, आबू इम्रान, आबू मुफ्ती सईद, आबू उमर सईद, महम्मद इस्माईल, जावेद इक्बाल, कर्नल सदातुल्ला, बट्टल मुर्शिद, आबू अमीर, आबू बशीर, आबू पठाण, आबू सालिया, आबू उर रहेमान यांचाही या 22 जणांच्या नावांत समावेश आहे.

close