मराठा महासंघ आणि वारकर्‍यांमधल्या वादाला फुटलं तोंड

June 23, 2009 2:13 PM0 commentsViews: 130

23 जून मराठा महासंघाच्या नेत्यांनी लिहिलेल्या पुस्तकात संतांविषयी अपप्रचार केल्याचा आरोप वारकर्‍यांनी केला आहे. या आरोपामुळे मराठा महासंघ आणि वारकर्‍यांमधल्या नव्या वादाला तोंड फुटलं आहे. वारकरी संघटनांनी पत्रक काढून मराठा महासंघांच्या लेखकांनी केलेल्या लिखाणाचा निषेध केला आहे. तसंच संबंधित पुस्तकांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांच्या मा.म.देशमुख, श्रीमंत कोकाटे आणि पुरुषोत्तम खेडेकर या नेत्यांनी शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्‍वर आणि रामदास तसंच धार्मिक विषयांवर पुस्तकं लिहिली आहेत. त्या पुस्तकांतून संत तसंच इतिहास पुरूष यांचा अपप्रचार करण्यात आल्याचं वारकर्‍यांचं म्हणणं आहे. यावर मराठा सेवा संघाचे प्रवीण गायकवाड आणि इतर नेत्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

close