शाहरूख, महेश भट आणि फराह खान पुजारीच्या निशाण्यावर ?

November 19, 2014 7:09 PM0 commentsViews:

shahrukh_khan_and_farah_khan_ravi_pujari 19 नोव्हेंबर : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या गँगने मुंबईत पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. निर्माते महेश भट यांच्यावर हल्ल्याचा कट उधळल्यानंतर पुजारी गँगच्या हिटलिस्टवर बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान आणि निर्मात्या फराह खान असल्याची धक्कादायक माहिती आयबीएन नेटवर्कच्या हाती लागली आहे.

रवी पुजारीची गँग पुन्हा एकदा मुंबईत सक्रिय होत असल्याची चिन्ह आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड फिल्म निर्माते महेश भट यांच्यावर हल्ला करण्याचा कट मुंबई पोलिसांनी हाणून पाडला. गेल्या दोन महिन्यांपासून पुजारी गँगचे सदस्य महेश भट यांच्यावर नजर ठेवून होते. या आठवड्यात भट्ट यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता. भट्ट यांच्यावर हल्ला करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी साध्या गणवेशात भट्ट यांच्या घराबाहेर सापळा रचला. आणि वेळीच पुजारी गँगच्या 13 जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यावेळी त्यांच्याकडून एक बाईक, पिस्तूल आणि लाखो रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. पुजारी गँगच्या टोळीकडून चौकशी दरम्यान त्यांचे पुढील टार्गेट शाहरूख खान आणि फराह खान असल्याचे उघड झालं. पोलिसांनी खबरदारी म्हणून शाहरुख आणि फराह यांच्या सुरक्षेत वाढ केलीये. विशेष म्हणजे याआधीही प्रिटी झिंटा-वाडिया प्रकरणात रवी पुजारीने हस्तक्षेप केला होता. पुजारीने प्रिती त्रास दिला तर नेस वाडिया यांच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. खंडणीसाठी ही गँग अशा प्रकारे उद्योगपती, व्यापारी, बिल्डर यांना आपला निशाणा बनवत आली आहे. त्यांना धमकीचे फोन करून त्यांच्याकडून खंडणी गोळा करणे हे छुप्या पद्धतीने सुरू आहे. पुजारी गँग आता पुन्हा एकदा सक्रिय झाली असून त्यांचा पुढील निशाणा बॉलिवूडचे स्टार असल्याचं समोर आलंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close