ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये सलूनमधून परतताना भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला

June 23, 2009 3:07 PM0 commentsViews: 6

23 जून ऑस्ट्रेलियात मेलबर्नमध्ये काझीम अली खान या भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला झाला आहे. तो हैद्राबादचा रहिवासी आहे. मेलबर्नमध्ये एका सलूनमधून परतत असताना त्याच्यावर दोन ऑस्ट्रेलियन तरूणांनी हल्ला केल्याचं काझीम अली खानने सीएनएन-आयबीएशी बोलताना सांगितलं. मात्र त्यांनी आपल्याकडून पैसे मागितले नाहीत तर हल्ला केला अशी माहिती त्याने दिली आहे. ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला होण्याची सोळावी घटना आहे. परदेशी विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांच्या संदर्भात ऑस्ट्रेलियन सरकारने एक टास्क फोर्स तयार केली आहे. आता या टास्क फोर्सच्या माध्यमातून भारतीयांवर होणा-या हल्ल्यांची चौकशी केली जाणार आहे. भारतीय विद्यार्थ्यांवर होणारे हल्ले पाहता ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाची समस्या ही बिकट होत आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या विद्यार्थ्यांवर होणा-या वाढत्या हल्ल्यांच्या विरोधात निदर्शनंही झाली होती. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान केव्हिन रूड यांनी या हल्ल्यांबाबत खेदही व्यक्त केला होता.

close