शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वगृही परतले

June 23, 2009 3:10 PM0 commentsViews: 4

23 जून बाळासाहेब ठाकरेंना लिलावती हॉस्पिटलमधून मंगळवारी डिसचार्ज मिळाला. गेले पाच दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते. श्‍वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना ऍडमिट करण्यात आलं होतं. शिवसेनेच्या 43 व्या वर्धापनदिना दिवशी शिवसेनाप्रमुखांची प्रकृती बिघडली होती. त्यांना आयसीयुमध्ये ठेवण्यात आलं होतं. प्रकृतीमध्ये सुधारणा होताच गेल्या रविवारी त्यांना आयसीयुतून बाहेर हलवण्यात आलं. त्यावेळीआगामी निवडणुकीत मला प्रचारासाठी उतरायचं आहे, तेव्हा मला लवकर बरं करा, अशी इच्छाही शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांकडे व्यक्त केली होती.

close