लालगडमधल्या विस्थापित नागरिकांसाठी सरकारच्या अपु-या सुविधा

June 23, 2009 3:20 PM0 commentsViews: 1

23 जून, लालगडसुकार्णो सेन लालगडमधल्या सुरक्षा रक्षक आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकींमुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना निर्वासितांच्या शिबिरात काही दिवसच राहता येणार आहे. तशा सूचना छावणी प्रमुखांनी दिल्या आहेत. त्यामुळे लालगडमधल्या नागरिकांसमोर मानवनिर्मित संकट उभं राहिलं आहे. सरकारने निर्वासितांसाठी जी तीन केंद्रं उभारली होती त्यात केवळ सहा हजार लोकांचीच व्यवस्था होऊ शकते. पण प्रत्यक्षात 10 हजार लोकांना लालगडमधून बाहेर काढण्यात आलं आहे. आधीच घरापासून दूर गेलेल्या लोक रोजच्या जगण्यासाठी झगडण्याच्या स्थितीत आहेत. आणि आता निर्वासीत छावण्यांमधली जागेची टंचाई पाहता जास्तीच्या विस्थापितांनी रहायचं कुठे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे लालगडमध्ये या मुद्यावरून पुन्हा लढा उभा राहण्याची शक्यता आहे. सध्या निर्वासित केंद्रामधून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा या निर्वासितांना केला जात आहे. ' लालगडमधल्या निर्वासित लोकांची व्यवस्था एका राजकीय पक्षाने केली असल्याची माहिती निर्वासित केंद्रांचे अधिकारी पार्थव घोष यांनी केली दिली आहे. एकाही निर्वासिताला छावणीतून हलवल्यास त्याविरुद्ध निदर्शनं करण्याचा इशारा तृणमूल काँग्रेसचे नेते देत आहेत.

close