बाबा रामपालला दणका,कोर्टाने नाकारला जामीन

November 20, 2014 11:22 AM0 commentsViews:

rampal in jail20 नोव्हेंबर :  तब्ब 36 तासांच्या धुमश्चक्रीनंतर अटक करण्यात आलेल्या स्वंयंघोषित बाबा रामपालचा जामीन रद्द करत त्याला दुपारी 2वाजता पंजाब आणि हरियाणा हायकोर्टासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

स्वंयंघोषित बाबा रामपालला आज गुरुवारी सकाळी सरकारी वकिलांनी पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाला हजर केलं. 2006च्या खून प्रकरणी कोर्टाने रामपालला दिलेला जामीन रद्द केला तर रामपालने कोर्टाचा अवमान केल्याचा खटला कोर्टाने स्वत:हून दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी आज (गुरवारी) दुपारी 2 वाजल्यानंतर होणार आहे. कोर्टाने वारंवार नोटीस देऊनही रामपाल कोर्टात हजर झाला नसल्याही ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

तब्बल दोन आठवडे भक्तांना पुढे करुन अटक टाळण्यासाठी अटोकाट प्रयत्न करणारे बाबा रामपाल यांनी ‘मी निर्दोष आहे. माझ्यावर लावलेले हे सर्व आरोप खोट असून मी काहीच चुकीचे केलं नाही’ असा दावा केला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close