गडचिरोलीत मेंदुज्वराचं थैमान

November 20, 2014 12:51 PM0 commentsViews:

20 नोव्हेंबर :  राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात मेंदुज्वरानं थैमान घातला आहे. ‘फॅल्सी पॅरम मलेरिया’ म्हणजेचं मेंदुज्वर हा मलेरियातला सर्वात जास्त गंभीर प्रकार समजला जातो. गडचिरोली जिल्हयात साध्या या मलेरियाचे तब्बल 11 हजार रुग्ण आढळले आहेत असून गेल्या 5 वर्षांतला सर्वात जास्त आकडा असल्याचं सांगण्यात येत आहे.

धानोरा, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, कोरची, गडचिरोली या तालुक्यांमध्ये याचा प्रादुर्भाव सर्वात जास्त आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. गेल्या 6 महिन्यांमध्ये मेंदुज्वरामुळे 17 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे, पण प्रत्यक्षात हा आकडा यापेक्षा जास्त असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे या रोगाचा सामना करण्यासाठी आवश्यक औषधांचा साठाही अपुरा पडतं आहे. वयस्कर रुग्णांना देण्यासाठी आवश्यक असेलल्या ACT गोळ्या उपलब्ध नाहीत. तर RT सुनेट ही इंजेक्शन्स फक्त 500 शिल्लक आहेत. मलेरियांच्या डासांना रोखण्यासाठी मच्छरदाणीला लावण्यासाठी आवश्यक असलेलं डेल्टा मॅथरीन हे औषधही उपलब्ध नाही.

दरम्यान, गडचिरोलीमध्ये मेंदुज्वराचं थैमान सुरू असताना, आवश्यक त्या उपाययोजना करण्यात सरकारला अपयश आलंय. सरकार गडचिरोलीमधल्या मलेरियाबाबत गंभीर नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांनी केला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close