सलमानने उडवली कतरीनाची खिल्ली, म्हणाला ‘कतरीना कपूर’ !

November 20, 2014 3:03 PM0 commentsViews:

salman khan and katrina kaif20 नोव्हेंबर : दबंग सलमान खान आपल्या तिरसट वागण्यामुळे या ना त्या घटनांमुळे नेहमी चर्चेत राहतो. आता तर आपल्याच एक्स गर्लफ्रेंड अर्थात कतरीना कैफला कतरीना कपूर अशी खिल्ली उडवून आपल्याच जखमेवर मिठ चोळण्याचा जाहीर पराक्रम केलाय.

बॉलिवूडचे दबंग स्टार सलमान खानची बहिण अर्पिता खान हिचा हैदराबाद इथं एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये शाही विवाह सोहळा पार पडला. त्यामुळे हा शाही विवाह सोहळा अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. बॉलिवूडचे अनेक स्टार, राजकीय नेते, उद्योगपती या शाही सोहळ्याला उपस्थित होते. सलमानचा जानी दुश्मन समजला जाणारा बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानही या सोहळ्याला उपस्थित होता. तसंच लग्नसोहळ्याला सल्लूची एक्स गर्लफ्रेंड कतरीना कैफ सुद्धा आली होती. यावेळी सलमानने कतरीनाला कतरीना कपूर म्हणत खिल्ली उडवली. घटना त्यावेळी घडली जेव्हा सलमानने कतरीनाला स्टेजवर येण्यासाठी आमंत्रित केलं. मात्र कतरीना स्टेजजवळ पोहचली आणि करण जोहरच्या मागे लपू लागली. त्यावेळी सलमानने आवाज देऊनही ती आली नाही. त्यावर सलमानने तीला कतरीना कपूर अशी हाक मारून स्टेज वर बोलावलं. हे ऐकून कतरीना खूप लाजली व स्टेजवर आली. कतरीना स्टेजवर येताच सलमानने, “तुला कतरीना खान बनण्याची संधी मी दिली होती पण तू कपूर होणे पसंत केले”, असा टोमणाही मारला. सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरीना कैफचे नाव रणबीर कपूरसोबत जोडण्यात येत असल्यामुळे कदाचित सलमानने हा टोला लगावला असावा.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close