भाजपला आमचा पाठिंबाच, ‘ती’ बातमी वेदनादायक -सुळे

November 20, 2014 8:36 PM1 commentViews:

20 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचा पाठिंबा हा स्थिरतेसाठी आहे पण माझा त्याला विरोध आहे असे वृत्त छापण्यात आले. पण मी तसं काही बोलले नाही. मी विरोध दर्शवला हे वृत्त बरोबर नाही, अशी खंत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

आजपर्यंत मी ज्या वृतपत्रावर विश्वास ठेवला. पण मी ज्या विषयावर बोलली नाही, त्याबद्दल बातमी छापण्यात आली. त्यामुळे मला दु:ख झालंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार पाडण्यात रस नाही असं स्पष्ट केलंय. त्यामुळे मी कोणतीही वेगळी भूमिका मांडली नाही. राष्ट्रवादीचा केवळ विकासाचा अजेंडा आहे असंही त्या म्हणाल्यात. तसंच पक्षाचा निर्णय आपल्याला मान्य आहे असंही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • vijay patole

    NO COMMENTS !! SILENCE IS REALLY GOLD !!

close