भाजपने विश्वासदर्शक ठराव पुन्हा मांडावा -जाधव

November 20, 2014 9:01 PM2 commentsViews:

jadhav on bjp20 नोव्हेंबर : भाजपने हिवाळी अधिवेशनात विश्‍वासदर्शक ठराव सादर करून बहुमत सिद्ध करावे. त्यामुळे जनतेच्या मनातला संभ्रम दूर होईल असं मत राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं. तसंच भाजपने राष्ट्रवादीकडे रितसर पाठिंबा मागावा. कोणत्या स्वरूपात पाठिंबा हवाय तेही भाजपनं सांगावं असंही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं.

‘आम्हाला सरकार पाडण्यात रस नाही’ अशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडल्यानंतरही राष्ट्रवादीतले नाराज नेते आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत आहे. भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय अजूनही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या पचनी पडलेला नाही हे त्यावरुन स्पष्ट होतं आहे. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना आपलं हे व्यक्तिगत मत आहे असं सांगून पक्षाविरोधातली नाराजी स्पष्ट केली. भाजपने विश्वासदर्शक ठराव जरी जिंकला असेल पण महाराष्ट्राच्या जनतेला पाठिंबा कुणाचा घेतला यासाठी पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव मांडावा. निदान महाराष्ट्राच्या जनतेला हे तरी कळेल की नेमका पाठिंबा कुणाचा घेतला. आम्ही बिनशर्त पाठिंबा दिलायच. पण सरकार सांभाळण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली नाही. ज्या वेळी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल तेव्हा तुमच्या बाजूने मतदान करायचं की, सभागृह त्याग करायचा हे भाजपने स्पष्ट केलं पाहिजे अशी भूमिका जाधव यांनी मांडली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Chandrakant Vajpeyi

  ————————————————————————————————————-
  =================== कायद्याची पायमल्ली कां करता ?? =====================
  … लांच्छन लावण्या पेक्षा विरोधक अविश्वास ठराव मांडून भाजपला सत्ताच्युत कां करीत नाही ? …
  ————————————————————————————————————-
  विचार करा की भाजपने विधान मंडळात विश्वासदर्शक ठराव जिंकला आणि त्यानंतरच महामहीम राज्यपाल साहेबांचे अभिभाषण झाले, असे असताना विधान मंडळात विश्वासदर्शक ठराव पुन: भाजपने मांडावा आणि तो पुन: जिंकून दाखवावा, असे वारंवार बोलणे काय महामहीम राज्यपाल साहेबांनी स्वीकारलेल्या व्यवस्थेचा अवमान नाही का ??

  खरे तर ज्यां राजकीय पक्षांना व नेत्यांना विश्वासदर्शक ठरावाच्या मंजुरित गफलत झाल्याचे आणि या मंजुरिच्या विरोधात अधिक आमदार आहेत असे वाटते त्यांनी आपल्या अधिकाराची संधि हुकवु नये | त्यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करावा आणि मनातला संभ्रम दूर करण्या साठी कायदे मान्य अविश्वास दर्शक ठराव विधान मंडळात ठेवावा | हा ठराव सत्ता-विरोधकांनी जिंकावा आणि भाजप च्या सत्तेस हुडकावून लावावे | “

close