90:10 कोटा फॉर्म्युलाची सुनावणी आता 29 जूनला

June 24, 2009 2:12 PM0 commentsViews: 1

24 जून अकरावी प्रवेशाच्या 90:10 कोटा फॉर्म्युलाची सुनावणी 29 जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. मुंबई हायकोर्टाने मुख्य न्यायाधीश न्या. स्वतंत्र कुमार आणि न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या खंडपीठाने सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पण कोटा फॉर्म्युलाची सुनावणी पुढे ढकलली असली तरी यंदाची अकारावीची प्रवेश प्रक्रिया वेळेवर सुरू राहणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना ऍडमिशनचे फॉर्म भरता येणार असल्याचा निर्णयही खंडपीठाने दिला आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना 90 टक्के जागा राखीव ठेवल्या जातील. तर उर्वरित 10 टक्के जागा इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मिळतील, असा 90:10 कोटा फॉर्म्युला महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याने ठरवला होता. या वादग्रस्त कोटा फॉर्म्युल्याच्या विरोधात केंद्रीय बोर्डाचे पालक आणि मुख्याध्यापक कोर्टात गेलेत. 25जूनला एसएसीचे निकाल जाहीर झाल्यावर आपल्या पाल्याला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार की नाही याची चिंता केंद्रीय बोर्डातील विद्यार्थ्यांच्या पालकांना लागली होती. पण आता कोटा फॉर्म्युलाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.

close