अकलूजमध्ये मनसे शहरप्रमुखाची निर्घृण हत्या

November 20, 2014 11:39 PM0 commentsViews:

rahul bhosle20 नोव्हेंबर : सोलापूर जिल्ह्यात अकलूजमध्ये मनसेचे शहरप्रमुख राहुल भोसले यांची भर चौकात निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये. अज्ञात मारेकर्‍यांनी तलवारीने वार करून हत्या केलीये. या घटनेमुळे अकलूजमध्ये एकच खळबळ उडालीये.

अकलूजमधील विजय चौकात रात्री 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडलीये. राहुल भोसले दुचाकीवरून आपल्या घरी जात होते. त्यावेळी चार ते पाच लोकांनी भर चौकात भोसले यांची दुचाकी अडवली आणि त्यांच्यावर तलवार, कुर्‍हाडीने हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह ताब्यात घेतलाय आणि पोस्टमार्टेमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय. भोसले यांच्या हत्यामुळे अकलूजमध्ये तणाव पूर्ण शांतता आहे. हल्लेखोर कोण होते याचा तपास पोलीस करत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close