बाबा रामपालला 5 दिवसांची पोलीस कोठडी

November 20, 2014 9:41 PM0 commentsViews:

baba_rampal420 नोव्हेंबर : स्वयंघोषित गुरू बाबा रामपालला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी आता 28 नोव्हेंबरला होणार आहे. 2006 मधल्या हत्येप्रकरणी त्याला देण्यात आलेला जामीन आज कोर्टाने रद्द केलाय.

रामपालला आज (गुरुवारी) हिसार जिल्हा कोर्टात हजर करण्यात आलं. त्याआधी सकाळी त्याला पंजाब, हरियाणाच्या हायकोर्टात हजर करण्यात आलं होतं. पोलिसांना हिसारमधल्या संपूर्ण कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. त्याच्या आश्रमातून किती शस्त्रास्त्रं ताब्यात घेण्यात आली याचीही माहिती त्या अहवालात देणं अपेक्षित आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close