बुलडाण्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणानं आणखी एका तरुणाचा बळी

November 21, 2014 10:12 AM0 commentsViews:

Buldhana

21 नोव्हेंबर : बुलडाणा जिल्ह्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणानं आणखी एक बळी घेतला आहे. संग्रामपूर तालुक्यातल्या पातुर्डा येथे ज्ञानेश्वर रमेश सुरडकर या तरुण शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे. तो 28 वर्षांचा होता.

ज्ञानेश्वर याच्यावर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. त्याने त्याच्या एक एकर जमिनीवर कर्ज घेतलं होतं. मात्र राब राब राबूनही पीक हाती आलंच नाही. त्यामुळे कुटुंबं कसं चालवायचं, आजारी आई वडिलांच्या औषधांचा खर्च कसा करायचा, कुटुंबाला दोन वेळा जेवायला कसं द्यायचं, असे अनेक प्रश्न त्याच्यासमोर होते. त्यात बँकेचं कर्जही फेडायचं होतं. यामुळे अखेर अतिशय तणावात त्याने विष घेऊन आत्महत्या केली. घरातला कमावता मुलगा गेल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाच्या डोंगर कोसळला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close