शिवसेनेच्या प्रवक्तेपदी तरूण शिलेदार; कोल्हे,भोसलेंना संधी

November 21, 2014 1:43 PM0 commentsViews:

shivsena spokeman new

21 नोव्हेंबर : जागावाटप असो अथवा सत्तेत सहभागाचा मुद्यांमुळे माध्यमांसमोर नेहमी शिवसेनेचे वेगवेगळे मतप्रवाह दिसून आले. त्यामुळे शिवसेनेनं आता प्रवक्तेपदाची धुरा नव्या शिलेदारांवर सोपवली आहे. आज एकूण सहा जणांची यासाठी निवड करण्यात आली आहे. शिव छत्रपतींची भूमिका साकारणारे डॉ.अमोल कोल्हे आणि कट्टर शिवसैनिक अरविंद भोसले यांना संधी देण्यात आली आहे. तर मनीषा कायंदे यांच्यावरही प्रवक्तेपदी निवड झालीये.

विधानसभेत विरोधीपक्षाच्या बाकावर बसल्यानंतर शिवसेनेनं अंतर्गत फेरबदल केले आहे. त्याची पहिली सुरूवात प्रवक्तेपदापासून केलीये. गेल्या महिन्याभरात शिवसेनेची बाजू मीडियासमोर मांडतांना सेनेचे नेते वेगवेगळी भूमिका मांडत होते. एकीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरोधीबाकावर बसण्याची घोषणा करत होते तर दुसरीकडे सेनेचे इतर नेते भाजपसोबत चर्चा सुरू असून सत्तेत सहभागाचे संकेत देत होते. त्यामुळे सेनेत संभ्रम निर्माण होत होता. त्यामुळे सेनेनं आपल्या प्रवक्तेपदात बदल केले आहे. डॉ.अमोल कोल्हे, अरविंद सावंत, अरविंद भोसले, मनीषा कायंदे, नीलम गोर्‍हे, विजय शिवतारे यांची प्रवक्तेपदी वर्णी लागलीये. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, माजी गटनेते सुभाष देसाई यांना प्रवक्तेपदातून मुक्त केलंय. शिवसेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे  वगळता उर्वरित प्रवक्ते हे सगळे नवीन चेहरे आहेत. विशेष म्हणजे नारायण राणे यांचा पराभव होईपर्यंत चप्पल घालणार नाही अशी शपथ घेणारे वरळीतील शाखाप्रमुख अरविंद भोसले यांना शिवसेनेने प्रवक्तेपद बहाल करण्यात आले आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close