‘भारतानं करून दाखवलं’, ‘टाईम’कडून मंगळयानाचं कौतुक

November 21, 2014 6:14 PM1 commentViews:

mars orbiter mission21 नोव्हेंबर : भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळ भरारी घेतली. भारताच्या या यशाचं सर्वच देशांकडून कौतुक होत आहे. याचीच दखल आता प्रसिद्ध ‘टाईम’ने घेतलीये. ‘जे प्रगत राष्ट्रांना जमलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. भारताने जो पल्ला गाठलाय, ते आजपर्यंत एकाही आशियाई देशानं केलेलं नाही’, अशा शब्दात टाईमनं मंगळयानाचं कौतुक केलंय.

भारताच्या महत्वाकांक्षी मंगळमोहिमने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. वर्षभराचा प्रवास करून मागील आठवड्यात भारताचे मिशन ऑर्बिट ‘मॉम’ मंगळाच्या कक्षेत स्थिर झालं. आजपर्यंत पहिल्याच प्रयत्नात मंगळ स्वारी करणार भारत हा पहिला देश ठरलाय. मंगळयान मोहिमेचं सर्वच क्षेत्रातून कौतुक करण्यात येते. आणि आता भारताच्या मंगळयानाचा गौरव टाईम मॅगझिनकडूनही करण्यात आला आहे. टाईम्स मासिकाने 2014 च्या सर्वोत्कृष्ट 25 संशोधनांमध्ये मंगळयानाची गणना केली आहे. जे प्रगत राष्ट्रांना म्हणजेच अमेरिका, रशिया आणि युरोपीय देशांनाही जमलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. भारताने जो पल्ला गाठलाय, ते आजपर्यंत एकाही आशियाई देशानं केलेलं नाही, अशा शब्दात टाईमनं मंगळयानाचं कौतुक केलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sandeep Mendhe

    After all INDIA is Best……

close