मुख्यमंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल का करू नये ? -कदम

November 21, 2014 8:37 PM0 commentsViews:

kadam on fadanvis21 नोव्हेंबर : अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदील झाला असून शेतकरी आत्महत्या करत आहे पण सरकार अजूनही शांत बसून आहे. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस हे काँग्रेस सरकारवर 302 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा इशारा देत होते. पण आता भाजप सरकारही तसंच करतंय म्हणून मुख्यमंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल करावा का ? असा संतप्त सवाल शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उपस्थित केला. शेतकर्‍यांना मदत द्या अन्यथा भाजप नेत्यांना घराबाहेर पडू देणार नाही असा इशाराही कदम यांनी दिला. ते नाशिकमध्ये बोलत होते.

शिवसेना विरोधीपक्ष नेते एकनाथ शिंदे आणि नेते रामदास कदम यांनी नाशिकच्या दौर्‍यावर आहे. आज त्यांनी शेतकर्‍यांचा नुकसानीची पाहणी केली. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार भरपाई द्या अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केलीये.
यावेळी कदम यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केलीये. जवळपास 100 टक्के शेती शेतकर्‍यांच्या हातातून गेली आहे. उभी पिकं वाया गेली आहे. पण सरकार अजूनही काही करत नाहीये. जेव्हा फडणवीस विरोधीपक्षात होते तेव्हा आघाडी सरकारवर ते तुडून पडत होते. शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवा नाहीतर तुमच्यावर 302 अंतर्गत गुन्हे दाखल करू असा इशारा देत होते. आता आम्हाला फडणवीस यांना विचारावे लागले जर आठवड्याभरात एका जरी शेतकर्‍याची आत्महत्या झाली तर तुमच्यावर 302 चा गुन्हा दाखल करावा लागेल असा इशारा कदम यांनी दिला. तसंच सरकारने विकासकामं बाजूला ठेवून तातडीने शेतकर्‍यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. जर सरकारने वेळीच पावलं उचलली नाहीतर भाजपच्या एकाही मंत्र्यांला घराबाहेर पडू देणार नाही. येणारं हिवाळी अधिवेशनही चालू देणार नाही असा इशाराही कदम यांनी दिला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close