शिवसेनेचं वीज केंद्रांविरुद्ध आंदोलन अधिकच भडकलं

June 25, 2009 11:29 AM0 commentsViews: 7

25 जून शिवसेनेने वरळीच्या जांभोरी मैदान इथल्या बेस्टच्या वीज बील भरणा केंद्रात गुरुवारी सकाळी पहाटे 5 वाजता जाळपोळ केली. त्यामुळे शवसेनेने छेडलेल्या वाढीव वीज बिलांविरुध्दच्या आंदोलनाला आता अधिक हिंसक वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संतप्त शिवसैनिकांनी वीजभरणा केंद्राला लावलेली आग इतकी भीषण होती की त्या केंद्राचा फक्त सांगाडाच शिल्लक राहिला असल्याचं प्रत्यक्षदशीर्ंनी आयबीएन-लोकमतला सांगितलं आहे. वरळीतला पोलीस बंदोबस्त शिथिल करताच आंदोलकांनी तोडफोड आणि जाळपोळीचं कृत्य केलं असल्याची प्रतिक्रिया प्रत्यक्षदशीर्ंनी दिली.बेस्ट, टाटा, महावितरण कंपनी आणि रिलायन्स एनर्जी यांनी वीज बिलांच्या दरात वाढ केल्यामुळे बुधवारी संतप्त शिवसैनिकांनी मुंबई आणि उपनगरातल्या वीज भरणा केंद्रांची तोडफोड केली. तसंच ग्राहकांना विजेची बीलं भरण्यास तीव्र विरोध केला. पोलिसांनी धरपकड आंदोलन सुरू करून गजानन कीर्तिकर, विशाखा राऊत, सुनील प्रभू, सुभाष वारीसे आणि जितेंद्र जनावळे या बीनीच्या शिवसैनिकांना अटक केलं. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी आंदोलन थोडंसं थंड झालं. त्यामुळे पोलिसांनी मुंबई आणि उपनगरातला पोलीस बंदोबस्त शिथिल केला. ही संधी साधून शिवसैनिकांनी जांभोरी मैदान इथल्या वीज बील भरणा केंद्राला आग लावली.

close