विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणार्‍या क्लार्कची धुलाई

November 21, 2014 10:34 PM0 commentsViews:

21 नोव्हेंबर : शाळेतील विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणार्‍या एका क्लार्कला महिलांनी आणि पालकांनी बेदम मारहाण करत पोलिसांच्या हवाली केलंय. पिंपरी- चिंचवडच्या रुपीनगर परिसरातील ज्ञानदीप विद्यालयात हा प्रकार घडला. या शाळेतील बाळासाहेब चौधरी हा क्लार्क वारंवार ऑफिसमध्ये बोलवून विद्यार्थिनींशी गैरवर्तणूक करत होता. 4 ते 5 वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. मात्र आज (शुक्रवारी) काही विद्यार्थिनी समोर आल्या आणि त्यांनी दामिनी ब्रिगेडकडे याची तक्रार केली आणि त्यानंतर दामिनी ब्रिगेडच्या महिलांनी आणि पालकांनी क्लार्कला चांगलाच चोप दिला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close