रजनीकांतसोबत सोनाक्षींची नवी इनिंग

November 22, 2014 12:14 AM0 commentsViews:

के एस रवीकुमार यांची निर्मिती असलेला ‘लिंगा’ नावाचा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. सुपरस्टार रजनीकांत आणि सोनाक्षीची जोडी या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सोनाक्षी सिन्हा या चित्रपटाद्वारे तमिळ डेब्यू करत आहे. लिंगा हा चित्रपट तमिळ, तेलगू तसंच हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला ए.आर.रेहमान यांनी संगीत दिले आहे. के एस रवीकुमार यांच्या सोबत असलेला रजनिकांतचा हा तिसरा सिनेमाही इतर सिनेमांप्रमाणेच एक ऍक्शनपट असणार आहे. यामध्ये सोनाक्षी एका गावाकडच्या मुलीच्या भुमिकेत दिसणार आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close