होर्डिंग्ज लावले तर पक्षातून हकालपट्टी, राज यांची कार्यकर्त्यांना तंबी

November 22, 2014 2:11 PM1 commentViews:

109raj_on_modi22 नोव्हेंबर : वाढदिवसाचे होर्डिंग्ज लावू नका…ज्याच्या वाढदिवसाचे होर्डिंग्ज लावेल, तो दुसर्‍या दिवशी आपल्या पदावर नसेल, अशी तंबीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी दिली. तसंच लोक आपल्यापासून दूर गेले असले तरी, तुम्ही त्यांच्यात मिसळला नाहीत, असंही राज म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज ठाकरे यांनी आज (शनिवारी )पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. या भाषणात त्यांनी अनेक गोष्टींची घोषणा केली. जे झालं ते झालं, पक्ष केवळ निवडणुकीच्या कामापुरता मर्यादित नाहीये. आपल्या वार्डात, विभागात खूप काम करण्यासारखं आहे. लोकांमध्ये मिसळला त्यांच्या समस्या समजून घ्या असा सल्ला वजा आदेश राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. ठिकठिकाणी हॉर्डिंग्ज लावली जातात, ‘हा आमचा बंडू, बंडूला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. कोण बंडू, कुठला बंडू ? आणि का तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असा शैलक्या शब्दात समाचार घेत राज यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघडणी केली. तुमची होर्डिंग्ज लावण्यापेक्षा आपल्या वॉर्डातील मतदारांचा नीट अभ्यास करा. कुणा ज्येष्ठ व्यक्ती, मान्यवर जर तुमच्या वॉर्डात असेल तर त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या त्यांना किती बरं वाटेल. पण आता यापुढे कुणाचे लाड होणार नाही आणि बेशिस्तीपणा खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात जर कोणत्याही पदाधिकार्‍यांनी जर वाढदिवसाचे होर्डिंग्ज लावले तर दुसर्‍या दिवशी तो पदाधिकारी पदावर राहणार नाही असा सज्जड दम राज यांनी कार्यकर्त्यांना भरला. तसंच राज यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा यासाठी कार्यकर्त्यांना स्वतःचा ईमेल आयडी दिला आहे. connectrajthackeray@gmail.com या मेल आयडीवर कार्यकर्त्यांनी आपले विचार, तक्रारी, समस्या पाठव्यात असं राज यांनी सांगितलंय.

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • ddd

    ata tech kara raj ..pakshat apan ekatech rahal…tumhi ata zero zalat …karyakartyana bal deyacha asta…sahebanchi nusati nakkal karu naka…tumachya botat ti takkat urali nahi

close