सुरेश प्रभूंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

November 22, 2014 1:23 PM0 commentsViews:

prabhu_uddhav_meet22 नोव्हेंबर : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई भेटीवर आले. त्यांनी शुक्रवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. जवळपास 20 मिनीटं त्यांनी उद्धव यांच्याशी चर्चा केली.

त्याअगोदर त्यांनी शिवाजी पार्कवर स्मृतीस्थळी जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. त्याचबरोबर सावरकर स्मारक आणि चैत्यभूमीवर जाऊनही त्यांनी आदरांजली अर्पण केली.

विशेष म्हणजे, प्रभू यांना भाजपने आपल्या कोट्यातून केंद्रीय मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी प्रभू यांनी सेनेला जय महाराष्ट्र करुन भाजपमध्ये प्रवेश केला होता. उद्धव आणि प्रभू यांच्या भेटीमुळे भाजप-शिवसेनेच्या समझोता होणार असल्याच्या चर्चांना सुरूवात झालीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close