मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दरबारी

November 22, 2014 2:07 PM0 commentsViews:

fadanivs_shah_meet22 नोव्हेंबर : मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज (शनिवारी) दिल्ली दौर्‍यावर आहे. फडणवीस नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि एकूण राजकीय परिस्थिती याबद्दल दोघांमध्ये चर्चा होणार आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाला नेमायचं, याबाबतही दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पुढच्या महिन्यात हिवाळी अधिवेशन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच शुक्रवारी रात्री केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close