खडसेंच्या समोर सेना-भाजप कार्यकर्ते भिडले

November 22, 2014 4:43 PM0 commentsViews:

osmanabad_sena_bjp22 नोव्हेंबर : शिवसेना आणि भाजपमधील वाद आता थेट हमरीतुमरीवर आलाय. उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मारहाण केल्याचा प्रकार आज घडलाय. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या समोर ही मारहाण झाली.

एकनाथ खडसे आज उस्मानाबाद जिल्हा दुष्काळ पाहणी दौर्‍यावर आले होते. यावेळी शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड भाजपच्या जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या घरी खडसे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी भाजपचे स्थानिक नेते संजय निंबाळकर यांनी तुळजापूर विधानसभा प्रचाराचा मुद्दा काढत खासदार रवींद्र गायकवाड यांच्याबरोबर हुज्जत घातली. यानंतर गायकवाड आक्रमक झाले आणि यावादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

दरम्यान खासदार रवींद्र गायकवाड आणि संजय निंबाळकर यांच्यात मारहाण झाली नाही. माझ्यासमोर शाब्दिक चकमक झाली असल्याचे सांगत या घटनेची कबुली खडसे यांनी दिली. खासदार गायकवाड यांच्यासोबत झालेल्या प्रकारचा शिवसेनेने निषेध केला असून पुन्हा असा प्रकार झाल्यास शिवसेना आपल्या स्टाआईलने उत्तर दिले जाईल असा सूचक इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी दिला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close