जैतापूरला विरोध कायम -उद्धव ठाकरे

November 22, 2014 6:49 PM0 commentsViews:

uddhav tuljapur422 नोव्हेंबर : ”शिवसेना जैतापूर वासीयांसोबत ठामपणे उभी आहे. जैतापूरला संघर्षाची परिस्थिती असतानाही मी अनेकदा गेलो आहे. शिवसेनेची भूमिका ठाम आहे”, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जैतापूरला आपला विरोध कायम असल्याचं स्पष्ट केलं.

विरोधी बाकावर बसल्यानंतर शिवसेनेचे नेते कामाला लागले आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याचा दुष्काळी भागाचा दौरा केला. तर शिवसेना नेते रामदास कदम यांनी नाशिकचा दौरा केला. आज उद्धव ठाकरे सहपरिवार कोकणच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी गणपतीपुळेला भेट दिली. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना जैतापूरचा विषय कधीच सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याआधी शिवसेनेनं आपल्या वचननाम्यात जाहीरपणे जैतापूर प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. शिवसेना पूर्णपणे जैतापूर वासीयांच्या पाठिशी आहे, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे असं उद्धव यांनी ठणकावून सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close