मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना नक्की असेल -पाटील

November 22, 2014 7:46 PM0 commentsViews:

chandrakant patil22 नोव्हेंबर :  येत्या 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान, होणार्‍या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना नक्की असेल, असं सुचक वक्तव्य राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. तसंच राज्यातलं सरकार अस्थिर नाही, शिवसेनेला सोबत घेऊन सरकार चालवू असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला.

दरम्यान, अशीच शक्यता शिवसेनेचे केंद्रातले मंत्री अनंत गीते यांनी बोलून दाखवलीय. राज्यातल्या भाजप सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत शिवसेना सकारात्मक असून त्यादृष्टीनं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बोलणी सुरू आहेत, असंही अनंत गीते म्हणाले.  हिवाळी अधिवेशनापूर्वी शिवसेना-भाजप एकत्र येतील, त्यादृष्टीने दोन्ही पक्षात कदाचित चर्चा सुरू होईल, अशी शक्यता दोन्ही पक्षातील नेते आता बोलून दाखवत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा युतीचे चिन्ह निर्माण झाले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close