सिंधुदुर्ग किल्ल्यासाठीची 50 लाख रुपयांची देणगी लवकरच -उद्धव ठाकरे

November 23, 2014 1:54 PM0 commentsViews:

uddhav beed sabha

23 नोव्हेंबर :  अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक व्हायलाच पाहीजे मात्र शिवरायांनी बांधलेल्या गड , किल्ल्यांचे आणि जलदुर्गाचंही संरक्षण झालेच पाहीजे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्याचं बरोबर बाळासाहेबांनी कबुल केलेली  सिंधुदुर्ग किल्ल्यासाठीची 50 लाख रुपयांची देणगी लवकरच देणार असल्याचं स्पष्टीकरणही उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौर्‍याचा आज दुसरा दिवस आहे. उद्धव ठाकरे यांनी आज सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली.

यावेळी किल्ल्याचे ट्रस्टी दत्ताराम सपकाळ यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी कबुल केलेल्या 50 लाख रुपयांच्या देणगीची आठवण करुन दिली. पण या देणगीचं नेमकं काय करणार हे माहीत नसल्याने ही देणगी देण्यात विलंब झाल्याची कबुली उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती मिळवून लवकरात लवकर देणगी देण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close