आमदार फुटण्याच्या भितीमुळेच शिवसेना लाचार – नारायण राणे

November 23, 2014 2:52 PM2 commentsViews:

7878narayan_rane

23 नोव्हेंबर :  सत्तेत न गेल्यास आमदार फुटतील अशी भिती शिवसेनेला वाटत असल्यानेच ते सत्तेसाठी लाचार झाले आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे. शिवसेनेला मंत्रिपद हवे असले तरी त्यांच्याकडे मंत्रिपदाची गुणवत्ता असलेला एकही नेता नाही असे राणेंनी म्हटलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौर्‍यावर असून त्यापार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी कणकवलीत पत्रकार परिषदेत शिवसेनेवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा म्हणजे फक्त पर्यटन आहे अशा शब्दात त्यांनी ठाकरेंच्या कोकण दौराची खिल्ली उडवली. ‘कोकणी माणसाने शिवसेनेला ताकद दिली मात्र शिवसेनेने कोकणी माणसाची फसवणूकच केली असून कोकणातील विकास प्रकल्पांना शिवसेनेचाच विरोध असतो असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शिवसेना सत्तेसाठी लाचार असून ते दुसर्‍यांना काय देणार असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • satyadev

    बाळासाहेबांमुळे नगरसेवकापासून ते मुख्यमंत्री हा प्रवास केलात, तरी शिवेसेना संपवण्याची भाषा सतत करत आहात. शिवसेना प्रमुखांना एकेरी बोलण्याची आपली थोर संस्कृती. मी कॉग्रेस मध्ये येताना सर्व बाण घेवून आलो अशा बाता मारल्यात पण निवडणुकीत आपण आपटी खाल्लीत. वाटले होते आता तरी डोक टांळ्यावर येयील पण तसे असते तर तुम्ही राणे कसले? शिवसेना लाचार झाली म्हणता मग मुख्यमंत्री पदासाठी ८ वर्षे दारात सुंगत होतात ती लाचारी कि मर्दानगी. राणे खानदानाची तीच मर्दानगी असेल कदाचित

  • GreatIndia

    aare ranya tuji layaki ahe ka bolayachi? tondavar padala ahe na, atta tari sudhar.

close