प्रसिद्ध पॉपस्टार मायकल जॅक्सनचं निधन

June 25, 2009 11:07 PM0 commentsViews: 5

26 जून आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पॉपस्टार मायकेल जॅक्सनचं हार्टअटॅकने निधन झालं. श्वसनाचा त्रास झाल्याने मायकलला लॉस एंजिलिसमधील हॉलम्बी हिल इथून युएलसीए मेडिकल सेंटरमध्ये हलवण्यात आलं. युएलसीए इथं उपचार सुरू असतानाच मायक लचं निधन झाल्याचं तिथल्या डॉक्टरांनी जाहीर केलं. तो 50 वर्षांचा होता.पॉपस्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मायकलची कारकिर्द वादग्रस्त राहीली. त्याच्या मृत्यूमुळे संगीत जगताबरोबरच जॅक्सनप्रेमींनाही मोठा धक्का बसला आहे.

close