राज्यात विरोध पण केंद्रात पाठिंबा कायम – संजय राऊत

November 23, 2014 8:15 PM0 commentsViews:

sanjay ruathjhfa

23 नोव्हेंबर : महाराष्ट्रातील मतभेदाचा केंद्रातील युतीवर परिणाम होणार नसून केंद्रामध्ये मोदी सरकारला शिवसेनेचा पाठिंबा कायम आहे असे स्पष्टीकरण शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहे. तर राज्यातील विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना मुख्य विरोधी पक्षाची भूमिका निभावणार असे संजय राऊत यांनी नमूद केल्याने शिवसेना – भाजपच्या एकत्र येण्याविषयी पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाले आहे.

उद्यापासून दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन होत असून या अधिवेशनातून शिवसेनेची भूमिका संजय राऊत यांनी स्पष्ट केली. केंद्रात आम्ही भाजपाला पाठिंबा देऊ असे त्यांनी सांगितले. तर राज्यातील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाविषयी संजय राऊत म्हणाले, राज्यातील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना विविध मुद्यांवरुन सरकारला धारेवर धरणार आहे. सध्या राज्यातील दुष्काळी भागाच्या दौर्‍यावर असणारे शिवसेना आमदार अधिवेशनात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे विरोधी पक्षाची भूमिका बजावतील, असा विश्वास  संजय राऊत यांनी व्यक्त केला. भाजप-शिवसेनेमध्ये चर्चा सुरू असल्याची मला कोणतीही माहिती नाही  असं म्हणत सध्या भाजप आणि शिवसेनेत परिस्थिती जैसे थेच असल्याचंही त्यांनी सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close