स्मृती इराणी पुन्हा वादाच्या भोवर्‍यात

November 24, 2014 1:29 PM1 commentViews:

4
24 नोव्हेंबर :  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी मंत्रिपदावर विराजमान झाल्यापासून विविध कारणांमुळे वादात अडकल्या आहेत. आता त्या एका ज्योतिषाकडे आपले भविष्य बघताना दिसून आल्या आहेत. एवढचं नाही तर या ज्योतिषाने त्या एकेदिवशी भारताच्या राष्ट्रपती होतील, अशी भविष्यवाणीही केली आहे. त्यामुळे स्मृती इराणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

राजस्थानच्या भीलवडा परिसरातील प्रसिद्ध ज्योतिष पंडित नथ्थूलाल व्यास यांच्यासमोर हात दाखवून स्मृती इराणी आपले भविष्य ऐकतानाचे दृश्य कॅमेरात कैद झाले आहे.

ज्योतिष नथ्थूलाल व्यास यांच्या घरी जाऊन स्मृती इराणी यांनी आपल्या भविष्याबाबत विचारणा केली. इराणी या आधीही ज्योतिष व्यास यांच्याकडे गेल्या आहेत. त्यावेळी इराणींना राजकारणात मोठं पद मिळेल असं भाकित ज्योतिषी नथ्थूलाल व्यास यांनी केलं होतं.

इराणी यांच्याकडे मनुष्यबळ विकास हे महत्त्वाचे खाते असून, त्यांच्याकडे शिक्षण क्षेत्राची जबाबदारी आहे. त्यामुळे देशातील विद्यार्थ्यांच भविष्य सुधारण्याची जबाबदारी असलेल्या इराणी यांनी स्वत:च एका ज्योतिषासमोर हात पसरल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होतं आहे. माझ्या खासगी जीवनात मी काय करते, याने जर मीडियाचा टीआरपी वाढत असेल तर त्यांना माझे आशीर्वाद, असं म्हणत स्मृती इराणींनी मीडियवरचं याचं खापर फोडलंय.

वादाच्या भोवर्‍यात : स्मृती इराणी

– स्मृती इराणी अमेठीमधून राहुल गांधींच्या विरोधात लढल्या
– त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे साधी पदवीही नसल्याचा आरोप काँग्रेसनं केला
मात्र त्यांच्याकडे अमेरिकेतील येल विद्यापीठाची पदवी असल्याचा त्यांनी दावा केला होता
– केंद्रीय विद्यालयांमध्ये जर्मन ऐवजी थर्ड लँग्वेज म्हणून संस्कृत सक्तीची करावी, असा निर्णय त्यांनी घेतला होता
पण चौफेर झालेल्या टीकेनंतर त्यांनी संस्कृत सक्तीची करणार नसल्याचं स्पष्ट केलंय
– पुन्हा ज्योतिषाकडे जाऊन स्मृती इराणींनी नवा वाद उभा केलाय

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Vikram

    This news is mischivous one… it is her personal belief to visit palmist…. Even Sonia gandhi visited shahi Imam before election…. was it a news? Aamir Khan visited Makka was it presented in this fashion?

    This news is nothing but stupid journalism

close