अकरावी ऑनलाईन ऍडमिशन वेबसाईटचा सर्व्हर डाऊन

June 26, 2009 9:09 AM0 commentsViews: 1

26 जून मोठा गाजावाजा करत सुरू केलेली 11 वीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया शुक्रवारी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे पूर्णपणे कोलमडली. मुंबईमध्ये नालासोपारा, कांदिवली, बोरिवली भागात सकाळी 9 वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी रांगा लावल्या. पण सर्व्हर ओपन होत नसल्यामुळे जेमतेम एखादा अर्जच भरून झाला. भांडूप, विक्रोळी भागातूनही सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. ऑन लाईन प्रवेशप्रक्रियेची वेबसाईट बनवणार्‍या महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशनला सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडबद्दल विचारल्यास त्यांनी अपग्रेडशनसाठी वेळ लागत असल्याचं कारण दिलं. शिवाय, सेकंदाला एक अर्ज येत असल्याचा मुंबईचे शिक्षण उपसंचालक व्ही. के. वानखेडे यांनी दावा केला. विद्यार्थी मात्र या गोंधळाला जाम कंटाळले होते. मुंबईमध्ये ऑनलाईन ऍडमिशन प्रवेशप्रक्रियेची 1400 सेंटर स्थापून ऑनलाईनसाठी योग्य सोय केल्याचा सरकारचा दावा असला तरी मोठ्या प्रमाणात सर्व्हरनेच दगा दिल्याचं दिसून येत आहे.

close