उस्मानाबाद जिल्ह्यात 4 दिवसांत 3 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

November 24, 2014 11:45 AM0 commentsViews:

farmer suicide

24 नोव्हेंबर : उस्मानाबादसह मराठवाड्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाचं सावट आहे. यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांत 3 शेतकर्‍यांनी आपलं जीवन संपवलं आहे. उस्मानाबाद तालुक्यातल्या वाघोली येथील गणेश नगर, परंडा तालुक्यातील तांदूळवाडी येथील दादा भारती आणि तुळजापूर तालुक्यातील पांगरधरवाडी येथील तानाजी कदम या शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. मराठवाड्यातून या वर्षभरात आतापर्यंत 45 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close