दापोलीत परदेशी पाहुण्यांची गर्दी

November 24, 2014 4:28 PM0 commentsViews:

24 नोव्हेंबर :थंडीची चाहुल लागताच परदेशी पाहुण्या पक्ष्यांची वर्दळ जाणवू लागते. कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर सीगल दाखल झाले आहेत. तिबेट तसंच आफ्रिकेतील थंड प्रदेशात पडणर्‍या कडाक्याची थंडी सहन होत नसल्यानं सीगल हजारो किलोमीटर उडत येतात. सध्या कोकणातील दापोली तालुक्यातल्या मुरुड-आंजर्ले, केळशीच्या समुद्रकिनार्‍यावर सध्या सीगल पक्ष्यांचे थवे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. उबदार हवामान आणि मुबलक प्रमाणात मिळणारे खाद्य यामुळे सीगल मोठ्या प्रमाणात कोकणात येतात. मात्र इथं सीगल पक्ष्यांची होणारी शिकारही चिंतेची गोष्ट बनली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close