शाहरुख आणि सलमानची जुगलबंदी

November 24, 2014 4:58 PM0 commentsViews:

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सलमान खानची बहिण अर्पिताचा शाही लग्न सोहळा बॉलिवूडमध्ये आणि माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. अर्पिता खानच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळाही मोठ्या शाही थाटात शुक्रवारी सायंकाळी मुंबईमध्ये पार पडला. यावेळी बॉलिवूडचे तमाम स्टार उपस्थित होते. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननेही या सोहळ्याला हजेरी लावली. रिसेप्शन सोहळ्यात ‘कट्टर वैरी’ असलेले शाहरूख आणि सलमान खान एकमेकांशी गप्पा मारताना, गंमती करताना दिसले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close