आत्महत्या करू नका, शिवसेना तुमच्या पाठिशी आहे -ठाकरे

November 24, 2014 7:17 PM1 commentViews:

uddhav_nanded24 नोव्हेंबर : तुम्ही आत्महत्येसारखा विषय मनात आणू नका, आत्महत्येसारखा पापी विचार मनात आणू नका, कृपया हे थांबवा, शिवसेना तुमच्या पाठिशी आहे असं आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय.

उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या मराठवाड्याच्या दौर्‍यावर आहेत. नांदेडच्या बाभुळगावमध्ये त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी सुदाम मोरे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी शिवसेना शेतकर्‍यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी आश्वासन दिलं.

तुम्ही गेल्यानंतर कुटुंबीयांची परवडे होते याचा विचार करावा, सरकार मदत देईल तेव्हा देईल. पण संकट कितीही मोठं असलं तरी शिवसेना तुमच्या पाठिशी आहे. तुम्ही धीर सोडू नका असं मला वचन द्या असं आवाहनही उद्धव यांनी केलं. तसंच आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाहीत असं सांगत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरू असं उद्धव यांनी जाहीर केलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • ddd

    udhavsaheb tumhala sahebane ka niwadla he ata kalate…kahi lok paksha bandhani karat firat ahet…tar kahi pathimba denyaghenyasathi kahi maharastra todnyasathi…pan tumhi amache asru pusnyasathi…shaharatil lokana duskalacha gambhrya ahe ki nahi mahit nahi pan shetkaryana kal awaghad ahe…shetmala bhaw nahi…

close