तुमची मुलगी शाळेत पोहोचली तुम्हाला कळेल ‘एसएमएस’वर !

November 24, 2014 7:02 PM0 commentsViews:

24 नोव्हेंबर : शाळेत गेलेली आपली मुलगी सुखरुप घरी येईपर्यंत आईबाबांच्या जीवाला घोर लागलेला असतो. या समस्येवर बदलापूरमधल्या शाळेनं एक अफलातून उपाय शोधून काढला आहे. तंत्रज्ञानाची मदत घेत त्यांनी एक असं मोबाईल ऍप तयार केलंय की, त्याद्वारे आपली मुलगी कुठं आहे हे पालकांना कळतं. तसंच विद्यार्थिनी शाळेत सुखरुप पोहोचल्यावर आणि घरी परतल्यावर पालकांना एक एसएमएसही पाठवला जातो. बदलापूरच्या शिवभक्त शाळेनं प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयडी कार्डमध्ये ‘स्टुटंड रेकग्निशन सिस्टीम’ म्हणजे एसआरएसचं सिस्टीम बसवली आहे. तसंच शाळेच्या गेटवर एक डिव्हाईस सिस्टीमही बसवली आहे. बदलापूरमधल्या पालकांनी या योजनेचं स्वागत केलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close