कधी थांबणार हे ?, अंधश्रद्धेपोटी माणसाला लटकवले जाते हुकावर !

November 24, 2014 8:28 PM0 commentsViews:

guhaghar24 नोव्हेंबर : देशात अंधश्रद्धेचं प्रस्थ किती मोठं आहे याची प्रचिती अनेक ठिकाणच्या उत्सवांवरून येते. कुठे लोटांगणं घालणारे भाविक तर कुठे बाभळीच्या काट्यांमध्ये उड्या मारणारे भाविक…गुहागरमध्येही असाच एक अंगावर शहारा आणणारा प्रकार घडतोय. नरवन गावात नवस फेडण्यासाठी बगाड उत्सव साजरा केला जातो. नवस फेडण्यासाठी भाविक पाठीच्या कातडीत लोखंडी हूक अडकवून त्याला दोरी बांधून पंधरा फूट अधांतरी तरंगत प्रदक्षिणा घालतात. देवदिवाळीच्या पूर्वसंध्येला हा उत्सव साजरा केला जातो.

देशभरात विविध ठिकाणी देवीच्या जत्रांचे उत्सव साजरे केले जातात. पण कोकणातल्या गुहागरमधल्या नरवन गावात नवस फेडताना पाहणार्‍याच्या अंगावर शहारे येऊ शकतात. नवस फेडण्यासाठी पाठीच्या कातडीत लोखंडी हूक घुसवून त्या हुकाला दोरी बांधून पंधरा फूट उंच लाटेवरून प्रदक्षिणा मारण्याची अनोखी प्रथा प्राचीन काळापासून सुरू झालीये. देवदिवाळीच्या पूर्वसंध्येला हा बगाड उत्सव साजरा केला जातो. हा आकड्याचा थरार पाहण्यासाठी या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. यावर्षी एक भक्ताने मारलेय दहा फेर्‍या जत्रेत आकर्षण ठरले.

या आगळ्यावेगळ्या बगाड्यात हुक टोचल्या गेलेय व्यक्तीला कोणतीही वेदना अथवा थेंबभर रक्तसुद्धा पाठीतून येत नाही. भक्तांनं हुक लावण्यापूर्वी भक्ताने एक दिवस उपवास करण्याची प्रथा आहे.

प्राचीन काळापासून ही प्रथा चालत आल्याच येथील गावकरी सांगतात. पेशवे काळाचाही संदर्भ देतात. 80 वर्षांपासून हे आपण पहात असल्याचाही खुलासा येथील वृद्ध देत आहेत. मंदिराच्या अनोख्या प्रथेप्रमाणे या ठिकाणी नवस कुणीही बोलू शकतो मात्र नवसकर्त्याला नवस फेडताना स्वत:च्या पाठीत हुक अडकवला जात नाही तर नवसकर्त्याच्या नवस फेडीसाठी गावातीलच व्यक्ती स्वत:च्या पाठीला हुक लावून नवस फेडतात. नवस फेडणारा भक्त हा देवीच्या सिमेतीलाच असावा लागतो अशी आख्यायिका आहे.

पारंपारिक देवीच्या उत्सवात आकडे टोचून घेण्याची प्रथा असली तरीही याठिकाणी केवळ प्रचंड श्रद्धा आणि देवाचे काम यामुळेच ही परंपरा नरवण गावात आहे. मंदिराची रचना देखील अनोखी आहे. एकही खिळा न वापरता केवळ लाकडाच्या सांधमोडीवर उभारलेले मंदिरही अनोखे आहे. पण या अंगावर शहारे आणणार्‍या या प्रकारामुळे हाच का पुरोगामी महाराष्ट्र असा प्रश्न पडतो.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close