उद्धव ठाकरेंनी ‘खडसा’वले, ‘असा उद्दामपणा केला तर अजित पवार होईल’ !

November 24, 2014 8:57 PM4 commentsViews:

uddhav_on_khadse24 नोव्हेंबर : मोठ्या कष्टाने ही सत्ता मिळाली आहे, त्यामुळे असा उद्दामपणा करू नका, असा उद्दामपणा करत असाल तर एकनाथ खडसे आणि अजित पवार यांच्यात फरक काय ? अशा परखड शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ खडसेंवर टीका केली. तसंच जर असाच उद्दामपणा करत असाल तर सत्ता सोडून द्या असा टोलाही उद्धव यांनी लगावला. ते नांदेडमध्ये बोलत होते.

एकीकडे बळीराजा आपले जीवन संपवत आहे तर दुसरीकडे आज महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळलंय. मोबाईलवर बोलणं थांबू नये म्हणून तुम्ही मोबाईलचं बिल भरता ना महिन्याचं महिन्याला पण ज्याच्यामुळे उजेड मिळतो त्याचं विजेचं बिल भरत नाही. मला काही हे पटत नाही अशा शब्दात खडसेंनी शेतकर्‍यांनाच सुनावलं. तसंच काही प्रमाणात पैसे भरा, काही प्रमाणात आम्ही सवलत देऊ ‘असा सल्लाही दिला. एकनाथ खडसे यांच्या विधानाच उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. मोबाईलला निदान नेटवर्क तरी असतं पण तुम्हाला 24 तास विज तरी मिळते का ?, महत्वाचा मुद्दा असा आहे की, एकनाथ खडसे आणि अजित पवार यांच्यात आता फरक तरी काय ?. हे सरकार सत्तेवर आलं खरं पण त्यामुळे पहिल्या सरकार आणि आताच्या सरकारच्या विचारात फरक पडलाय. हे शेतकर्‍याला कळलं पाहिजे. पण जर अजित पवारांसारखा उद्दामपणा असले तर त्यांच्यासारखीच फळ चाखावी लागेल असा सणसणीत टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तसंच मोठ्या कष्टाने मिळालेलं सरकार आहे जर नीट चालवता येत नसेल तर दुर्देव आहे. ही काही मस्ती आहे ती अयोग्य आहे अशा शब्दात उद्धव यांनी खडसावले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Aruna Joshi

  Who is Uddam???? Khadse or Uddhav??? Uddhav is Uddhat….He will change is tone the moment they get entry in Mantri Mandal………

  • vishal

   shivsenecha stand clear ahe pahele BJP ne jahir karave tyanche 145 amdar konte ahet magach tyanni bolave nahitar ghari basave

 • Rupi D. Dexter

  Havaa geli ahe yanchya kaanaat…

  aani sarv shetakari postpaid use kartaat hi mahiti ya sahebanna koni dili..?

  @ Aruna Joshi Madam aata satta sthaapan zali ahe aani viroshi paksh neta pan jahir zala ahe…
  zala gela visra aata

 • Rupi D. Dexter

  हा सत्ते माज आला आहे आज पर्यत विरोधी पक्षात असतान बळीराजासाठी भाडणारे आज त्याच्या विरोधात बोलताहेत सरकार चा धिकार असे

close