मुख्यमंत्री गडचिरोलीत

November 24, 2014 9:47 PM0 commentsViews:

24 नोव्हेंबर  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवारी) गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर त्यांनी पहिली भेट दिली ती नक्षलप्रभावित गडचिरोलीला…त्यांनी कुरखेडा या अति संवेदनशील भागात जाऊन वनविभागाच्या अगरबत्ती प्रकल्पाची पाहणी केली. त्यांनी तिथल्या मजुरांशी चर्चा केली. गडचिरोलीत सध्या मेंदुज्वरानं थैमान घातलंय. या पार्श्वभूमीवर त्यांनी देऊळगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यांनी रुग्णांशीही संवाद साधून तिथल्या समस्या जाणून घेतल्या. मेंदुज्वरावर उपचारासाठी लवकरच आरोग्य आराखडा तयार करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close