मुंबईत दमदार पाऊस : अनेक भागात साचलं पाणी

June 26, 2009 11:20 AM0 commentsViews: 1

26 जून मुंबईत गुरुवारी रात्रीपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने मुंबईकर सुखावला खरा पण पहिल्याच पावसात दादर, भायखळा या भागात पाणी साचलं. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चार गाड्या घसरून किरकोळ अपघात झाले. वाकोला ब्रीजखाली पहाटे तीनच्या सुमारास एक डिझेल ट्रक घसरला होता. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर डिझेल पसरलं होतं. थोड्याच अंतरावर दूध- दही वाहून नेणारी एक जीपही पावसामुळे रस्त्यावरून घसरली. एक स्कॉर्पिओ गाडी आणि ट्रकला अपघात झाला. पण सुदैवाने यात कोणाही जखमी झालं नाही. गुरुवारी दुपारी पावसाचा जोर ओसरल्यावर वाहतूक व्यवस्था पूर्ववत सुरळीत चालू झाली. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी लेक्चर्स बंक करून पहिल्या पावसाचा मनसोक्त आनंद लुटला.

close