काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. आर. अंतुले यांची प्रकृती अत्यवस्थ

November 25, 2014 10:36 AM0 commentsViews:

antulay--621x414

25 नोव्हेंबर : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. आर. अंतुले यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. अंतुले यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अंतुले किडनीच्या विकाराने आजारी आहेत. त्यामुळे गेल्या महिन्यात त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यावरही ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close