शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला तर सुंठीवाचून खोकला जाईल – शरद पवार

November 25, 2014 11:50 AM0 commentsViews:

sharadpawar-kc8F--621x414@LiveMint

25 नोव्हेंबर : शिवसेना आणि भाजप जर एकत्र आले तर त्यांना कुठच्याच पक्षाच्या पाठिंब्याची गरज राहणार नाही आणि सुंठीवाचून खोकला जाईल, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या तिसाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शरद पवार कराडला गेले होते. तिथे पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताच शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता. मात्र राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यास भाजप तयार नाही आणि त्याबाबत राष्ट्रवादीतही कुरबुरी सुरू आहेत. त्यातच आता पुन्हा शिवसेना-भाजपमध्ये सत्तेत एकक्ष येण्याबाबत चर्चा सुरु झाल्याची चिन्हं आहेत. त्यावर शरद पावरांनी दोन्ही पक्षांनी एकत्र यावे की नाही हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे, असं नमूद केलं. राज्यात स्थिर सरकार यावं यासाठीच आम्ही भाजपाला पाठिंबा दिला, याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केलं. तसंच कमी आमदार निवडून आल्यामुळे राष्ट्रवादी विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मी ऊसकरी शेतकरी आहे. मला आशा आहे की सत्तेतले लोक आता उसाला चांगला भाव मिळवून देतील, असा टोला शरद पवारांनी राजू शेट्टी यांना लगावला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close