शेतकर्‍यांबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला -खडसे

November 25, 2014 1:43 PM1 commentViews:

Eknath khadse11

25 नोव्हेंबर : मी शेतकर्‍यांच्या वीज बिलासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे खडसेंनी स्पष्ट केले असून माझे वाक्य अर्धवटच दाखवण्यात आले. शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा करणारे एकनाथ खडसे आणि अजित पवार एकच, असा टोला उद्धव यांनी खडसेंना लगावला होता. त्या पार्श्वभूमीवर बोलताना खडसेंनी उद्धव यांना प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आणि यावर ठोस पावलं उचलण्यासाठी सरकारवर दडपण वाढतच चालले आहे. याचाच एक भाग म्हणून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या वीजबिलाला स्थगिती देण्यात आली आहे. मोबाईलचं बिल भरता मग वीज बिल का नाही भरत, या वक्तव्यावरून चहूबाजूंनी जोरदार टीका झाल्यानंतर आता महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी आपली भूमिका बदलत शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे.

एकनाथ खडसेंनी नेमक्या कोणत्या घोषणा केल्या ?
– दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांची वीज तोडणे आणि वीज बील वसुलीला स्थगिती
– टंचाईग्रस्त शेतकर्‍यांना वीजबिलात 33 टक्के सूट
– दुष्काळग्रस्तांना पाण्याचे टँकर पुरवण्याचे सरकारचे आदेश
– दहावीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • ddd

    are natha tond jyast fadu nako…janta rawacha rank karate ..modikrupena milaly bomblat jawu nako…kartavyashunya manasa…virodhi pakhsat nahis tu …tenvha fukatchya bata marat hotas…khabardar khadasya tond sambhalun bol…

close