दोन महिन्यांपूर्वी गाव पिंजून काढणारे नेते आता कुठे गेले? – उद्धव ठाकरे

November 25, 2014 2:51 PM0 commentsViews:

uddhav_on_ncp

25 नोव्हेंबर : दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात जत्रा भरली होती, प्रत्येक गाव न गाव पिंजून काढणारे देशातले मोठमोठे नेते आता कुठे गेले? त्यांची लाट ओसरल्यावर आता मात्र समोर कोरडा मराठवाडा दिसत आहे. आता त्यांना या दुष्काळग्रस्तांचा विसर पडला आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौर्‍यावर आहे. तिथे बोलत होते.

विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येक गाव न गाव पिंजून काढणारे मोठमोठे नेते आता कुठे गेले? संकट कोसळल्यानंतर मोठी माणसं फोटोमध्येच दिसायला लागली आहेत, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. शेतकरी कसा राहतोय हे बघण्यासाठी मी तुमच्या भेटीला आलोय, असं म्हणत त्यांनी शेतकर्‍यांसोबत संवाद साधला.  मला शेतीतलं फारस काही कळत नाही, पण ज्यांना कळतं ते बाहेर फिरताना दिसतायत का? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी शेतकर्‍यांना विचारला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close